Bailahongala

हजरत हाफिज बारी-शाह दर्ग्यात संदल कार्यक्रम

Share

बैलहोंगल परिसरातील मोठ्या तलावाशेजारी हिंदू – मुस्लिम बंधुभावाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या हजरत हाफिज बरी शाह दर्ग्यात संदल कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हिरेबागेवाडीचे सय्यद ताजुद्दीन खाद्री उर्फ जिद्दान बाबा यांच्या उपस्थितीत मुसीम समाजाचे धर्मगुरू लतीफ पिरा तोलगी यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तूरचे सुफी संत अब्दुल रजाक खादारी हाश्मी, काद्रोळ्ळीचे सुफी खासिम शाह खादरी हाशमी, क्लीफया मंजलेदादा, धारवाडचे हाफिज कारि अमानुल्ला खादरी यांच्या नेतृत्वाखाली संदल कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे नेतृत्व करणारे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू लतीफ पिरा तोलगी बोलताना म्हणाले, देशात सुफी, शरण, संत यांनी समानतेचे संदेश दिले आहेत. सौहार्दतेचे शक्ती केंद्र असणारा हजरत हाफिज बरी शाह दर्ग्यात शांतीचा संदेश देत सर्वधर्मसमानतेच्या मूल्यांचे पालन केले जाते, असे त्यांनी सांगितले.

सत्तूरचे सुफी संत अब्दुल रजाक खादरी हाश्मी यांनी विशेष प्रार्थना केल्यानंतर मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, सुफी, संत आणि शरण स्वामींनी घालून दिलेल्या तत्वावर प्रत्येकजण चालेल तेव्हाच जीवन धान्य होईल. देवावर श्रद्धा, भीती आणि भक्ती या तिन्ही गोष्टी असतील तर आपण कोणत्याही संकटातून सुटू शकतो. आज या दर्ग्यात देशात उत्तम पीक पाणी, शांतता आणि सौहार्द नांदावे यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सत्तूरचे सुफी संत अब्दुल रजाक खादरी हाश्मी यांनीही मनोगत व्यक्त करताना सुफी-संत-शरणस्वामींनी दिलेल्या सन्मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

यावेळी दर्ग्यात उत्तम पीक पाण्यासाठी तसेच देशात शांतता, सौहार्द नांदावे यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. यावेळी मुस्लिम समाजाचे नेते रफिक बडेघर, बाबूसाब सुतगट्टी, सुभानी सय्यद, इस्माईल बडेघर, इलियास वड्डू, शकील पिरजादे, दिलावर धूपदाळ, इकबाल जमादार, बसीर मदलमट्टी आदींसह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Tags: