मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची नेतृत्वशैली हि महिलांसाठी आदर्श असल्याचे मत विनय गुरुजी यांनी व्यक्त केले. आज उडुपी जिल्ह्यातील बैन्दूर तालुक्यातील हेरंजालुवी येथे एका उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या महिलांसाठी आदर्श असून त्या आधुनिक इंदिरा गांधी आहेत. कर्नाटक राज्याच्या राजकारणात मी पाहिलेल्या सर्वात धाडसी महिला आहेत. शिवाय दहा पुरुष राजकारण्यांची ताकद महिला मंत्रीपदी विराजमान असलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे आहे अशा शब्दात गौरीगद्दे आश्रमाचे मठाधिपती विनय गुरुजी यांनी शनिवारी उडुपी जिल्ह्यातील बैन्दूर तालुक्यातील हेरंजालुवी येथे नव्याने बांधलेल्या शेफ टॉक न्यूट्रीफूड्स प्रायव्हेट लिमिटेड केंद्राच्या उद्घाटन समारंभात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी गृहलक्ष्मी योजनेचे कौतुक देखील त्यांनी केले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या कोणत्याही राजकीय पार्श्वभूमीशिवाय राजकारणात उच्च पदावर पोहोचल्या असून त्यांची नेतृत्वशैली इतरांसाठी एक उदाहरण असल्याचे विनय गुरुजी म्हणाले.

यावेळी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, पुढे येण्यासाठी संघर्ष गरजेचा आहे. संघर्ष करणाऱ्यांची किंमत माणसाला कळते. ग्रामीण भागात अधिकाधिक उद्योग उभारले पाहिजेत. उद्योजकांना पाठबळ दिले पाहिजे. या कारखान्याचे उद्घाटन करताना मला खूप आनंद झाला आहे. कारखाना उभारणे हि सोपी गोष्ट नाही. यामागे खूप कष्ट आणि अडचणी पार करून यावे लागते. छोट्या गावापासून दिल्लीपर्यंत व्यवसाय विस्तारित करणाऱ्या करणाऱ्या गोविंद पुजारी यांचे यश खरोखरच वाखाणण्याजोगे असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी उडुपी-चिक्कमंगळुरु लोकसभा मतदारसंघाचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी, शेफ टॉक न्यूट्री फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक गोविंद बाबू पुजारी, राजू पुजारी, विजय शेट्टी, संजीव, ग्रामपंचायत अध्यक्षा नगम्मा देवाडिगा आदी उपस्थित होते.


Recent Comments