Belagavi

उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी मंत्री सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्री पद द्या – आमदार आसिफ सेठ

Share

 

उत्तर कर्नाटकच्या विकासाच्या हितासाठी मंत्री सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्री पद द्यावे, अशी मागणी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री पदाबाबत हायकमांडचा निर्णय अंतिम असेल. उत्तर कर्नाटकचा विकास पाहता या भागातील आमदारांना डीसीएम पद देणे अत्यावश्यक आहे. लोकप्रिय मंत्री सतीश जारकीहोळी हे प्रामाणिक, कष्टाळू आणि अनुभवी राजकारणी आहेत.

प्रत्येक समाजाला उपमुख्यमंत्री पद मागण्याचा अधिकार आहे. उत्तर कर्नाटकातील लोकांना त्यांच्या मागणीच्या समस्या सोडवण्यासाठी बंगळुरूला दूरवर जावे लागते. मात्र या भागातील जनतेच्या मागण्या आणि समस्यांची पुरेपूर जाण असलेले सतीश जारकीहोळी यांच्या सारखे दुसरे कोणीही नाही. त्यांना उपमुख्यमंत्री पद द्यावे, अशी आमची सुरुवातीपासून मागणी होती. अजूनही आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.

आता केवळ उपमुख्यमंत्र्याची मागणी केली म्हणजे प्रशासन नीट चालत नाहीय असा होत नाही. सर्व काही ठीक आहे. उत्तर कर्नाटकच्या विकासाच्या दृष्टीकोनातून सतीश जारकीहोळी यांना पदाची मागणी करणे चुकीचे आहे का, असा सवाल त्यांनी केला. हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगितले.
सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाल्यावर पक्षाने अडीच वर्षांच्या कालावधीत बदल करण्याचा करार केला नाही. ही केवळ माध्यमांची निर्मिती असल्याचे ते म्हणाले.

Tags: