Belagavi

आम. आसिफ सेठ यांच्या हस्ते अंगणवाडी शिक्षिकांना स्मार्ट फोनचे वितरण

Share

बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार आसिफ सेठ यांनी कर्नाटक सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने मंजूर केलेल्या अंगणवाडी शिक्षिकांना स्मार्ट फोन आणि आरोग्य किटचे वाटप केले.

उत्तर विभागात येणाऱ्या अंगणवाडी शिक्षिकांना कर्नाटक राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाकडून मंजूर झालेले स्मार्ट फोन, साड्या, आरोग्य किट आणि वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार आसिफ सेठ म्हणाले की, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अंगणवाडीतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी समस्या सोडविल्या असून त्यांच्या प्रयत्नातून नवीन स्मार्ट फोन, साड्या, हेल्थ किट आणि मुलांना पुस्तके देण्याचे काम सुरू आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्वजण घरी असताना काम करणे अवघड झाले होते. पण अंगणवाडी सेविकांनि आपले काम प्रामाणिकपणे केले. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. अंगणवाडीच्या कामाची माहिती देण्यासाठी स्मार्ट फोनचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच अंगणवाड्यांना त्यांच्या स्वत:च्या इमारती देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहितीही आमदारांनी दिली.

अंगणवाडी सेविकांना आधीही स्मार्ट फोन वितरित करण्यात आले होते. मात्र त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याने शासनाला माहिती देणे शक्य होत नव्हते. यासाठी आता नवे स्मार्टफोन देण्यात आले आहेत असे आमदारांनी सांगितले. पोषण अभियानात बेळगाव तिसऱ्या क्रमांकावर असून आता नवीन प्रकल्पांचा लाभ घेऊन बेळगाव पहिल्या क्रमांकावर अनु असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी अंगणवाडी शिक्षिका व सेविका उपस्थित होत्या.

Tags: