Belagavi

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देऊ नये

Share

विश्व हिंदू परिषद बजरंग दल बेळगाव जिल्ह्याच्या वतीने बेळगावचे पोलीस आयुक्त इडा मार्टिन यांना भेट देऊन , लव्ह जिहाद, गोरक्षण, महिला संरक्षण, धर्मांतर रोखण्यासाठी जाणाऱ्या आमच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देऊ नये अशी विनंती केली.

याबाबत त्यांच्याशी चर्चा करून सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले . यावेळी विश्व हिंदू परिषद प्रांत सेलचे अध्यक्ष कृष्णा भट, जिल्हा सचिव आनंद करलिंगन्नवर, जिल्हा उपाध्यक्ष मुनिस्वामी भंडारी, . शांता भंडारी, विभाग गोरक्षा प्रमुख विजय जाधव, बजरंग दलाचे जिल्हा समन्वयक संतोष मडिगर, जिल्हा सहसचिव गणेश चौघुले, षण्मुखप्पा व बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: