KARNATAKA

चित्रदूर्गमध्ये भाजप कार्यकर्त्यांची राज्य सरकारविरोधात जोरदार निदर्शने

Share

 

महसूल विभागाची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांचे वाल्मिकी विकास महामंडळाच्या पैशाच्या गैरव्यवहाराकडे लक्ष नसणे कसे शक्य आहे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी बी.वाय.विजयेंद्र यांनी केली .

चित्रदुर्गातील ओणके ओबाव्वा सर्कलमध्ये जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला. बॅरिकेडवर चढून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विजयेंद्र हे घटनास्थळी होते.

पोलिसांनी आंदोलकांना रोखले असता शाब्दिक बाचाबाची, आणि धक्काबुक्की झाली. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी बी.वाय. विजयेंद्र आणि नेत्यांना अटक केली.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत त्यांनी “वाल्मिकी विकास महामंडळाच्या पैशांचा गैरवापर झाला नाही, याकडे अर्थखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा,’ अशी मागणी बी.वाय.विजयेंद्र यांनी केली .

कोलार जिल्ह्यात विरोधी पक्षनेते आर.अशोक म्हणाले कि , मंत्री बी. नागेंद्र यांनी वाल्मिकी विकास महामंडळात 20% खाल्ले. पण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 80% खाल्ले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा. याची मागणीही आम्ही सभागृहात करणार आहोत. जोपर्यंत मुख्यमंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: