Belagavi

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना दणका

Share

बेळगाव शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर रहदारी पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली . दिवसभरात २७१ हुन अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली
गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा याच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे एसीपी पवन एन, वाहतूक दक्षिणचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर, उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील बारा प्रमुख ट्रैफिक सिग्नलवर जागृतीची मोहीम राबविली

ट्रैफिक सिग्नलवर वाहतूक नियम मोडण्याचे प्रकार वाढले आहेत. हिरवा सिग्नल पडण्याअगोदरच वाहने
पुढे नेली जातात, अनेकजण सिग्नलवर युटर्न करतात, झेब्रा क्रॉसिंग हे पादचाऱ्यांसाठी असते. मात्र, झेब्रा क्रॉसिंगवरच आपली वाहने उभी करतात. या सर्व नियमांविषयी ट्रैफिक सिग्नलवर ध्वनीक्षेपकावरून माहिती देण्यात आली. हिरवा सिग्नल सुरू होण्याआधी वाहनचालकांनी पुढे जाऊ नये,
पादचाऱ्यांना जाण्यासाठीच्या झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करू नयेत, पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवर पार्किंग करू नये, आदींविषयी अधिकारी पोलिसांनी वाहनचालकांना माहिती दिली. वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांनी सहा ट्रैफिक सिग्नलवर तर उत्तर विभाग पोलिसांनी पाच वाहतूक सिग्नलवर जनजागृतीची मोहीम राबविली. काही रस्त्यांवर सम-विषम पार्किंगची व्यवस्था असते. मात्र, पाचा विचार न करता रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने उभी केली जातात, त्यामुळे वाहनचालकांबरोबरच पायी चालत जाणाऱ्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो.
कॉलेज रोडवर उभ्या करण्यात आलेल्या दुचाकींना लॉक लावण्यात आले.

आवाहन करूनही नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती एसीपी पचन एन. यांनी दिली वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई वाहतूक उत्तर विभाग पोलिसांनी दिवसभरात १२६ वाहनचालकांवर कारवाई करून ५२ हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर वाहतूक दक्षिण
विभाग पोलिसांनी १४५ वाहनचालकांवर कारवाई करून ७४ हजार रुपये दंड वसूल केला आहे. कॉलेज रोडवर पवन हॉटेलपासून मंदे खुटपर्यंत मनमानी पार्किंग करणाऱ्या दुचाकीस्वारांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या वाहनांना लॉक लावल्यामुळे दुचाकीस्वारांची पंचाईत झाली.

Tags: