Belagavi

अंगणवाडी सेविकांना मोबाइल, किट आणि साड्यांचे वितरण

Share

डिजिटल तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली असून या तंत्रज्ञानाचा वापर करून आपले कौशल्य वाढविणे गरजेचे आहे असे मत महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.

आज कुमार गंधर्व कला मंदिर येथे मंत्री हेब्बाळकर यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना मोबाईल, वैद्यकीय किट आणि साड्या वाटप करण्यात आल्या. यावेळी त्या बोलत होत्या

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये अंगणवाडीची स्थापना करून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण येण्यास सुरुवात केली. मात्र आता डिजिटल तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे यासाठी प्रत्येकाने आपले कौशल्य वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व माहिती उपलब्ध होते. आणि हल्ली एका बोटावर सर्व माहिती उपलब्ध होते. असे लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.

Tags: