आपण बेळगाव महापालिकेकडून आलो आहे आणि ड्रेनेज चेंबर स्वच्छ करायचे आहे नाहीतर ते सांडपाणी तुमच्या कंपाऊंडमध्ये घुसेल . चेंबर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेला ८ हजार रुपये भरावे लागतील असे सांगून एका व्यक्तीने सुभाषनगर येथील डॉक्टरला चुना लावल्याची घटना बेळगावमधील सुभाष नगर येथे घडली आहे .
काल सकाळी बेळगाव मधील सुभाष नगर येथील डॉ . कमलाकर आचरेकर यांच्या बंगल्यावर एक माणूस आला . आपण महापालिकेकडून आलो असल्याचे त्याने डॉक्टरांना सांगितले कि ड्रेनेजची चेंबर ब्लॉक झाला आहे आणि ड्रेनेजचे सांडपाणी तुमच्या बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये घुसण्याची शक्यता आहे . ड्रेनेज स्वच्छ करण्यासाठी आणि तहासाठी जाळी बसवण्यासाठी महापालिकेकडे तुम्हाला ८ हजार रुपये भरावे लागतील आणि नंतर ते तुम्हाला महापालिकेकडून परत मिळतील .
ड्रेनेजच्या कामासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी डॉ . आचरेकर यांनी आपल्या ड्रॉयव्हरला पैसे देऊन त्या व्यक्तीसोबत पाठवले . मात्र त्या व्यक्तीने डॉक्टरांच्या ड्रायव्हरला गुंगारा देऊन पैसे घेऊन पळ काढला . सदर व्यक्तीची छबी डॉक्टरच्या बंगल्यातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे .
शहरात जनतेला फसवण्याचा रोज नवनवीन फंडे अवलंबले जात आहेत . नागरिकांनी कोणावरही विश्वास ठेवण्याआधी पूर्ण शहानिशा करावी अन्यथा आपले नुकसान होऊ शकते . त्यामुळे सावधान राहावे असे आवाहन डॉ. आचरेकर यांनी केले आहे .


Recent Comments