Bailahongala

तिगडी गावात बस सुविधेच्या मागणीसाठी आंदोलन

Share

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळापत्रकानुसार बस सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी बैलहोंगल तालुक्यातील तिगडी गावात आंदोलन करण्यात आले.
बैलहोंगल तालुक्यातील तिगडी गावात विद्यार्थी व जनतेने मानवी साखळी करून रास्ता रोको करून आंदोलन केले.

परिवहन विभागाला अनेक निवेदने देऊनही बस वेळेवर येत नसल्याने प्रचंड त्रास होत असल्याने विद्यार्थ्यांनी आज आंदोलन केल्याचे सांगितले .

परिवहन विभागाने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कंटाळून दुसरी बस गावात सोडली, मात्र ती इथेच मर्यादित न ठेवता रोज योग्य वेळी बस सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन विद्यार्थी व स्थानिक नागरिकांनी परिवहन विभागाला केले आहे. .

Tags: