Belagavi

माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेत हेलन केलर यांची 144 वी जयंती साजरी

Share

 

बेळगावमधील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेत , हेलन केलर यांची 144 वी जयंती तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या अंध विद्यार्थ्यांचे स्वागत व वाणींत विद्यालयाच्या लेखनिक विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ पार पडला .

विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संस्थेच्या उपाध्यक्षा कीर्ती रजपूत यांनी सर्वांचे स्वागत केले . कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी राजेश्वरी संबरगीमठ यांनी हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करून , नूतन विध्यार्थ्यांना पुष्प देऊन , स्वागत केले . अशोक चिंदक यांच्या हस्ते एसएसएलसी विध्यार्थ्यांसाठी लेखनिक म्हणून सहकार्य केलेल्या वनिता विद्यालयाच्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला . सोनम पाटील हिने हेलन केलर यांच्या विषयांनी माहिती दिली .

संती शिक्षिका स्मिता मितगर यांनी तबला विभागासाठी वारली पेंटिंग ची चित्रे काढून अंध विध्यार्थ्यांना या वाद्यांची माहिती उत्तम प्रकारे मिळावी यासाठी प्रयत्न केला आहे . या भावचित्रांचे उदघाटन मान्यवर्णाच्या हस्ते करण्यात आले .
या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते . शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गावडे यांनी सर्वांचे आभार मानले तर शिल्पा कुसालापूर यांनी सूत्रसंचालन केले .

Tags: