बेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे जीएसटी आणि इन्कम टॅक्स या विषयावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने , गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या केके वेणुगोपाल सभागृहात बेळगाव जीएसटी आणि प्राप्तिकर या विषयावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अभय पाटील यांच्या हस्ते झाले. त्याचवेळी बेळगाव
शहरात टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची इमारत बांधण्याचे निवेदन देण्यात आले. कार्यक्रमाला आलेले आमदार अभय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार अभय पाटील यांनी टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या इमारतीच्या बांधकामासाठी बुडा जमीन देण्याचे व बांधकामासाठी सुमारे 10 लाख रुपये मंजूर करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी , सी.ए. संजय, बेंगळुरू येथील सी.ए. जतीन ख्रिस्तोफर यांनी सहभाग घेतला. महांतेश एम. उडदार, महांतेश दाडीगुंडी, जितेश कब्बूर, श्रीधर पाटील, भरतेश मुरगुंडे, टी.एन.मलगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी टॅक्स अभ्यासकांना मार्गदर्शन केले.
यावेळी विविध मान्यवर व सीए यांची उपस्थिती होती


Recent Comments