Belagavi

खुल्या राज्य रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगाव संघाला 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 2 कांस्य पदके

Share

कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनने 22 ते 25 जून 2024 दरम्यान तुमकूर आणि बंगलोर येथे आयोजित केलेल्या ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगाव संघाने 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 2 कांस्य पदके जिंकली.

अथर्व हडपद बेल्ली, हिरेन राज 2 सुवर्ण, दृष्टी अंकले 1 रौप्य, 1 कांस्य , अवनीश कोरीशेट्टी 1 सुवर्ण, 1 रौप्य, रश्मिता अंबिगा 2 सुवर्ण, जयध्याना एस राज 2 सुवर्ण
देवेन बामणे 1 सुवर्ण, 1 रौप्य, साईराज मेंडके 1 सुवर्ण, 1 रौप्य, खुशी आगशीमणीला 1 रौप्य, 1 कांस्य पदक मिळाले. या सर्व स्केटिंगपटूंना सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकर गौडा आणि विश्वकर गौडा या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे. डॉ.प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीताराम यांनी प्रोत्साहन दिले आहे.

Tags: