चोरीची तक्रार नोंदवल्यानंतर दोनच दिवसांत प्रकरणाचा छडा लावत हारुगेरी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 2.84 लाखांचे मोबाईल जप्त केले आहेत.

याबाबत पत्रकारांशी बोलताना सीपीआय रविचंद्रन डी बी म्हणाले, मोबाईल दुकानाच्या मालकाने दिलेल्या तक्रारीनुसार तपास करत ४८ तासात आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनि २४ एप्रिल रोजी हारुगेरी परिसरातील कॅनरा बँक लुटण्याचा प्रयत्न केल्याचेही कबूल केले आहे. ()
या कारवाईत हारुगेरी सीपीआय रविचंद्रन, डीबीपीएसआय गिरीमल्लप्पा उप्पार यांच्यासह हारुगेरी पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
Recent Comments