Belagavi

महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीतील अडथळा दूर करण्यासाठी विशेष अधिकारी मंगेश चिवटे बेळगावात दाखल

Share

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदत निधीतून सीमाभागातील गरजू आणि गरीब लोकांच्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत केली जाते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांनी या योजनेतील अडथळा दूर करण्यासाठी बेळगावातील रुग्णालयांना भेट देऊन चर्चा केली.

बेळगाव केएलई व अरिहंत रुग्णालयाला मंगेश चिवटे यांनी भेट देऊन चर्चा केली. या योजनेतील अडथळे दूर करून रुग्णांना आर्थिक मदत केली. बेळगाव शहर व विभागातील अनेकांनी वैद्यकीय मदतीसाठी आर्थिक मदतीचे अर्ज सादर केल्याने विलंब झाला. याबाबत माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदत निधी योजना व मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांनी आज बेळगाव केएलई व अरिहंत रुग्णालयाला भेट देऊन चर्चा केली. तसेच कृष्णा पन्हाळकर यांना यकृत प्रत्यारोपणासाठी 2 लाख रुपये, प्रशांत हांडे यांना मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 2 लाख रुपये, अभिजीत सावंत यांना हृदय प्रत्यारोपणासाठी 2 लाख रुपये आणि सिद्धप्पा रवळूचे यांना ओपन हार्ट सर्जरीसाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. याबाबत मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांनी इन न्यूजला अधिक माहीत दिली.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, आनंद आपटेकर, अनिल अमरोळे, मजुकर आदी उपस्थित होते.

Tags: