Belagavi

येळ्ळूर-धामणे शेतकऱ्यांना सरकारी बसमध्ये नो एंट्री?

Share

परिवहन मंडळाचे बसचालक मनमानी कारभार करत असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर-धामणे येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

बेळगावच्या केएसआरटीसी डेपो क्रमांक २ येथे आज बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर-धामणे शेतकऱ्यांनी केएसआरटीसी बस कर्मचाऱ्यांच्या वागणुकीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

येळ्ळूरआणि धामणे हे थोडे डोंगराळ भाग आहेत, याठिकाणी बससेवा नाकारली जाते. तसेच या भागात बहुतांश नागरिकांचा व्यवसाय शेतीवर अवलंबून आहे. शेतात जाण्यासाठी अनेक महिला बसचा वापर करतात. मात्र, शेतकरी महिलांना बसमध्ये चढू देत नसल्याचा प्रकार पुढे आला असून परिवहन बस थांबत नसल्याने विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी, शहरात शिक्षणासाठी जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेना यांच्या नेतृत्वाखाली केएसआरटीसी आगार क्रमांक 2 च्या व्यवस्थापकांना आवाहन केल्यानंतर त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून असे प्रकार घडू नयेत यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच असे प्रकार पुढे घडल्याचे निदर्शनात येताच संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी समिती नेते आणि श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी इन न्यूजला अधिक माहिती दिली.

यावेळी शेतकरी नेते राजू मरवे, येळ्ळूर- धामणे येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: