Belagavi

खासदार जगदीश शेट्टर यांचा सत्कार

Share

बेळगाव जिल्हा हुगार, गुरव, जीर आणि पुजार समाज सेवा संघाच्या वतीने बेळगावचे नूतन खासदार जगदीश शेट्टर यांचा सत्कार करण्यात आला.

संगमेश्वर नगर येथे आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात आम. भीमशी जारकीहोळी, भरतेश अण्णा डोंगरे यांच्या उपस्थितीत जगदीश शेट्टर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार जगदीश शेट्टर यांनी समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष शिवानंद हुगार, उपाध्यक्ष प्रभू हुगार, सचिव मोहन हुगार, संघटना सचिव मोहन हुगार, अर्जुन हुगार, खजिनदार डी.एस.हुगार, महादेवप्पा हुगार, सचिव मारुती गुरव, कार्यकारिणी सदस्य विवेकानंद हुगार, बसवराज हुगार, भरत हुगार आदी उपस्थित होते.

Tags: