Hukkeri

हीरा साखर कारखाना ऊस उत्पादकांची देणी लवकरच देणार – आमदार निखिल कत्ती

Share

हिरा साखर कारखान्याला ऊस पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत ३० कोटी रुपये अदा करण्यात आले असून २४ जून नंतर उर्वरित थकबाकीची रक्कम देण्यात येईल, अशी माहिती हुक्केरीचे आमदार आणि साखर कारखान्याचे अध्यक्ष निखिल कत्ती यांनी दिली.

आज हुक्केरी शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सदर माहिती दिली आहे. यंदा कर्नाटक सरकारने वीजबिल भरण्यासाठी विलंब केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकारी बँकांमधून कर्ज वितरण करण्यात आले नाही . साखरेची विक्रीही थांबली असून या कारणासाठी शेतकऱ्यांची बिले देण्यास उशीर झाला आहे. यासाठी आम्ही दिलगीर असून शेतकऱ्यांकडून आंदोलन छेडण्यात आले यात काही चुकीचे नसल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या समस्या सरकार जाणते असे निखिल कत्ती म्हणाले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते, कारखान्याचे संचालक उपस्थित होते..

Tags: