बेळगाव महापालिकेच्या 22 व्या कालावधीतील चार स्थायी समित्यांच्या सदस्य निवडीसाठी 2 जुलै रोजी निवडणूक होणार आहे, अशी माहिती एस. बी. शेट्टेन्नावर यांनी दिली.

2 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत महानगरपालिकेच्या सभागृहात विविध चार स्थायी समित्यांसाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत. दुपारी तीन वाजता निवडणूक प्रक्रियेची सुरुवात होणार आहे, अशी माहिती बेळगाव महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष तथा प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेटेन्नवर यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.


Recent Comments