hubbali

राज्यात तीन उपमुख्यमंत्री असण्यात अडचण काय : केएन राजण्णा यांचा सवाल

Share

राज्यात तीन उपमुख्यमंत्री असण्यात अडचण काय आहे? असा प्रश्न सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी उपस्थित केला.

राज्यात तीन उपमुख्यमंत्री असावेत याबाबत मध्यंतरी आपण एआयसीसी अध्यक्षांशी चर्चा केली. मात्र निवडणुका समोर असल्याने हा मुद्दा जनतेसमोर मांडण्याची गरज नसल्याचे एआयसीसी अध्यक्षांनी सांगितले, काल सतीश जारकीहोळी यांनीदेखील पत्रकार परिषदेत मुद्दे मांडले, ते मुद्दे योग्यच होते, अशी प्रतिक्रिया हुबळी येथील पत्रकार परिषदेत सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी मांडली.

रेणुका स्वामी खून प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, दर्शन पूर्वी चांगला व्यक्ती असल्याने त्याला कृषिदुत म्हणून नेमले होते. मात्र आता त्याचे वर्तन समजल्यानंतर त्याला कुठलीही जबाबदारी कुणीही देणार नाही. सेलिब्रेटी असला तरीही त्याला कायद्यानुसारच वागणूक दिली जाईल, असे ते म्हणाले.

भविष्यात काँग्रेसचे सरकार येणार नाही या सोमण्णा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, भाजप दिवास्वप्न पाहत आहे.भाजप नेत्यांना जे वाटते ते त्यांना बोलू द्या, आणि समाधान मिळवू द्या असा टोला लगावत सुरज रेवण्णा प्रकरणासंदर्भात आपल्याला माहिती नसल्याचे ते म्हणाले.

पेट्रोल दरवाढीवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले कि, शेजारील राज्यात आपल्या राज्यापेक्षा अधिक पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत. सरकारला महसुलाची गरज आहे असे विरोधक सांगत आहेत, याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या, राज्यातील हमी योजना टिकणार नाहीत असे त्यांचे मत आहे. मात्र या सर्व अफवा असून हमीयोजना कोणत्याही कारणास्तव बंद होणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे पुढेही हमीयोजना सुरूच राहतील असे त्यांनी सांगितले.

Tags: