वक्फ मालमत्ता 12 लाख एकर नाही तर 34 हजार एकर आहे, ती जागा गरिबांची आहे, कुणाच्या बापाची मालमत्ता नाही अशा शब्दात मंत्री जमीर अहमद यांनी आम. बसनगौडा पाटील यत्नाल यांच्यावर सडकून टीका केली आहे.
मंत्री जमीर अहमद यांनी विजयपुर येथे माध्यमांशी संवाद साधला. वक्फ बोर्डाच्या जमिनीसंदर्भात आम. बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केलेल्या विधानावर प्रत्त्युत्तर देत हि जमीन कुणाच्या बापाची नसून ती गरिबांची असल्याचे विधान केले. हि जमीन जर आमच्या वडिलांची असती तर ती आम्ही कुणालाही वाटली असती असेही ते म्हणाले.
राज्यातील हमी योजनांसंदर्भात बोलताना ते म्हणाले, हमीभाव योजना राजकीय फायद्यासाठी दिल्या जात नाहीत, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच म्हटले आहे. आमचे सरकार आल्यावर गरीबांच्या मदतीसाठी आम्ही हमी योजना दिल्या असून कोणत्याही कारणास्तव हमीभाव योजना बंद करण्याचा प्रश्नच येत नाही, असे मंत्री जमीर अहमद म्हणाले.
लोकांना आपल्या सरकारकडून अपेक्षा आहेत. हमीभावातून मिळणारे अनुदान थोडे अडचणीचे आहे. 55 हजार कोटी रुपये हमीभावासाठी खर्च करण्यात येत आहेत. मात्र हमीभाव योजना दिल्या तर अनुदान मिळणार नाही, असे काहीही नाही. हमीयोजनांसह विकासासाठीही निधी देण्यात येत असून हमी योजनांमुळे विकासाला थोडा विलंब होत असल्याचेही जमीर अहमद यांनी मान्य केले.
उपमुख्यमंत्रीपदाबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, उपमुख्यमंत्रीपद मागायला काय हरकत आहे? प्रत्येक समाजाला उपमुख्यमंत्रीपद द्यावे, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात अंतर्गत मतभेद नसून हायकमांड निर्णय घेईल, असे ते म्हणाले.


Recent Comments