award

राज्यस्तरीय स्विमिंग-डायव्हिंग स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंचे यश

Share

राज्यस्तरीय स्विमिंग-डायव्हिंग स्पर्धेत उत्तम कामगिरी करत बेळगावच्या संघाने ३ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य पदके पटकाविली आहेत.

कर्नाटक जलतरण संघटनेने बेंगळुरू येथील हलसूरू केन्सिंग्टन पूल येथे राज्यस्तरीय जलतरण व डायव्हिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये बेळगाव आबा हिंद स्पोर्ट्स क्लबच्या डायव्हर्सनी उत्कृष्ट कामगिरी करत 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकाविले.

युवराज मोहनगेकर 2 सुवर्ण, मयुरेश जाधव 1 सुवर्ण 1 रौप्य, आणि अर्णव कुलकर्णी 1 रौप्य, 1 कांस्य अशी पदके पटकाविली आहेत. 6 ते 9 जुलै 2024 दरम्यान इंदोर, मध्यप्रदेश येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी कर्नाटक राज्य संघातून त्यांची निवड करण्यात आली असून या स्पर्धकांना एनआयएसचे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार अभय पाटील, शिवराज मोहिते, मोहन सप्रे, शीतल हुलाबत्ते, अरविंद संगोळी यांनी यशस्वी स्पर्धकांचे कौतुक केले आहे.

Tags: