Athani

खास.प्रियांका जारकीहोळी यांचे अथणी शहरात जल्लोषात स्वागत

Share

चिक्कोडी लोकसभा मतदार संघाच्या खासदारपदी निवडून आलेल्या प्रियांका जारकीहोळी यांचे आज अथणी शहरात जल्लोषी स्वागत करण्यात आले.

व्हॉइस : नूतन खासदार म्हणून निवडून आलेल्या प्रियंका जारकीहोळी यांचा अथणी शहरातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी भव्य सत्कार केला.

यावेळी बोलताना प्रियांका जारकीहोळी यांनी आपल्या विजयासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व मतदार, कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानले. मतदारांच्या समस्यांना मी तत्काळ प्रतिसाद देईन व आगामी काळात विकासकामे करणार असून माझ्या जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज म्हणून नेहमीच विकासकामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गजानन मंगसुळी बोलताना म्हणाले, अनेक दशकांपासून न झालेली कामे आम्ही नूतन खासदारांच्या निदर्शनास आणून दिली असून विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिल्याचे ते म्हणाले.

Tags: