विजयपूर बाह्यपरिसरात असणाऱ्या मदरसा येथे धर्मगुरू तन्वीर पिरा हाशमी यांची मंत्री जमीर अहमद खान यांनी भेट घेतली.
विजयपूर मार्गावरून कलबुर्गी कडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या मदरशात भेट देऊन मंत्री जमीर अहमद खान यांनी तन्वीर पीर हाश्मी आणि मुस्लिम नेत्यांची भेट घेतली. यावेळी मंत्री जमीर अहमद यांचे नेत्यांनी स्वागत केले.
काही दिवसांपूर्वी देशभरात धर्मगुरू तन्वीर पीर हाशमी यांच्यासंदर्भात बातम्या पुढे येत होत्या. त्यांचे आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे आरोप विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केले होते. मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी हाश्मी यांच्या सोबत एका व्यासपीठावर हजेरी लावली यावरून टीकाही करण्यात आली होती. दरम्यान आज जमीर अहमद खान यांनी मदरशाला भेट देऊन हाशमी यांच्याशी चर्चा केली. यावेळी क्रीडापटूंना आर्थिक मदत म्हणून १० हजार रुपयांचा निधी सुपूर्द करण्यात आला.


Recent Comments