PRESS MEET

पाकिस्तानात जाऊन मंत्री जमीर अहमद यांनी वक्फ मालमत्ता बनवावी : आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ

Share

मंत्री जमीर अहमद खान आणि आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या मुद्द्यावरून वाद सुरूच आहे. वक्फ बोर्डासाठी मंत्री जमीर अहमद यांच्या वडिलांनी मालमत्ता दिली आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री जमीर अहमद यांनी पाकिस्तानात जाऊन वक्फ मालमत्ता बनवावी असे म्हटले आहे.

मंत्री जमीर अहमद यांनी केलेल्या विधानाला प्रत्त्युत्तर देताना आमदार यत्नाळ म्हणाले, काश्मीरमध्ये ३७० कलम स्थापन करून ताब्यात घेतलेली वक्फ मालमत्ता भारत सरकारने दलित आणि गरिबांना देण्याचा आग्रह केला. नेहरूंची सर्वात मोठी आपत्ती म्हणजे त्यांनी वक्फचा काळा कायदा आणला आणि आपल्या देशातील 12 लाख एकरहून अधिक जमीन वक्फला दिली. हिंदूंच्या जमिनीही वक्फला दिल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचवेळी त्यांनी साखर मंत्री शिवानंद पाटील यांच्यावर ताशेरे ओढले, शिवानंद पाटील आदिलशहा आहेत कि टिपू सुलतान असा टोलाही त्यांनी लगावला.

मंत्री शिवानंद पाटील यांच्या विभागाची काही माहिती मी सहकार विभागाच्या आयुक्तांकडे मागितली आहे. मला अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मी आमदार असल्याने कोणतीही माहिती विचारली तर द्यावीच लागेल. उद्या मी विधानसौध येथे आयुक्त व मंत्री यांच्या विरोधात तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.

आपण प्रामाणिक असल्याचे सांगणारे मंत्री शिवानंद पाटील अधिकाऱ्यांना घाबरवत फिरत आहेत. त्यांचा संपूर्ण घोटाळा बाहेर काढू, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी यत्नाळांनी विधान परिषद सदस्य सूरज रेवण्णा यांच्या अटकेवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Tags: