Accident

मद्यधुंद अवस्थेत कार चालविणाऱ्या तरुणाचा हायड्रामा!

Share

दारू पिऊन चारचाकी चालवणाऱ्या तरुणाने बस आणि दुचाकीला धडक देऊन कारवर चढून धिंगाणा घातल्याची घटना घटना धारवाड येथील ज्युबली सर्कलजवळ घडली.

धारवाडमधील केसीडीमार्गाने कार चालवत असलेल्या एका तरुणाने आपली कार बसला आदळली. पुढे त्याच मार्गाने जात आणखी काही दुचाकींना धडक दिली. मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या तरुणाला कलाभवनजवळ नागरिकांनी अडविले. मात्र या तरुणाने चक्क कार वर चढून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनीही हजेरी लावली. मात्र मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने कारवरून खाली येण्याचे नाव घेतले नाही. हा गोंधळ बराच वेळ सुरु होता. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी देखील जमली. दरम्यान वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून तरुणाला ताब्यात घेतले.

Tags: