Belagavi

बेळगावमध्ये डॉ. शामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथीचे आचरण

Share

भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दक्षिण मतदार संघात भाजपाच्यावतीने पुण्यतिथी साजरी करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

‘एक देश मे दो विधान, दो प्रधान नही चलेंगे’ असे काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेल्या कलम ३७० विरोधात आंदोलन करणाऱ्या भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनगोळमधील श्री शिव चिदंबर मंदिराच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी दक्षिण मतदार संघाचे आमदार अभय पाटील यांनी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी नगरसेविका वाणी जोशी, गिरीशा धोंगडी, नितीन जाधव, जयंत जाधव यांच्यासह स्थानिकांनी सहभाग घेतला.

Tags: