Crime

हुबळीत ऑटो ड्रायव्हर ओनर्स असोसिएशनच्या अध्यक्षाच्या मुलाची हत्या

Share

उत्तर कर्नाटक ऑटो चालकांच्या अध्यक्षाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला असून हुबळीमध्ये पुन्हा चिंतेचे सावट पसरले आहे..

आपल्या मित्रांसोबत सायंकाळी बाहेर गेलेला मुलगा मृतावस्थेत आढळला.. याप्रकरणी मृत मुलाच्या वडिलांनी सुनेच्या माहेरच्या कुटुंबियांवर आरोप केला आहे.

एकीकडे पोलीस अंधारात घटनेचा माग काढत आहेत.. दुसरीकडे कुटुंबीय रुग्णालयासमोर आंदोलन करत आहेत असे दृश्य हुबळी शहरात पाहायला मिळाले. मृत तरुणाचे नाव आकाश असे असून तो उत्तर कर्नाटक ऑटो ड्रायव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते शेखरय्या मठपती यांचा मुलगा आहे. शनिवारी संध्याकाळी लोहिया शहरात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला असून तो आपल्या मित्रांसमवेत बाहेर गेला होता. मात्र मित्रांनी शेखरय्या यांना फोन करून आकाश गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्याचे सांगितले.

घरच्यांच्या विरोधाला न जुमानता मयत आकाशचे सहा वर्षांपूर्वी अन्नपूर्णा नावाच्या तरुणीशी आंतरजातीय विवाह झाला. आकाश हुबळी सोडून गोकर्ण मध्ये पत्नीच्या कुटुंबासोबत राहत होता. आकाश आणि अन्नपूर्णा यांना एक गोंडस मुलगी देखील आहे.. पुढे आपल्या मुलाच्या प्रेमाची कदर करत शेखरय्याने लग्नाला होकार दिला आणि एक भव्य कार्यक्रम करून आपल्या सुनेचा गृहप्रवेश केला. परंतु अलीकडेच आकाश एकटाच हुबळीला परत आला. यावेळी आपल्या पत्नीच्या घरच्यांनी पैशासाठी आपला छळ केल्याचे आकाशने सांगितले. पत्नीच्या आई वडिलांनी मोठ्या प्रमाणात कर्ज काढले असून पैशासाठी आपला छळ केल्याचा आरोप आकाशने केला होता. याच कारणास्तव आकाश व्यसनाधीन झाला होता असेही सांगण्यात येत आहे.

आकाशाची अशी अवस्था पाहून गेल्या अनेक दिवसांपासून त्याला हुबळी येथे ठेवण्यात आले होते. दरम्यान आकाशच्या पत्नीने आकाशला त्याच्या मित्रांच्या सोबतीने एका निर्जनस्थळी नेऊन मद्यपान करविले आणि त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून करण्यात आला असा आरोप आकाशच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी डीसीपी रवीश यांच्या नेतृत्वाखालील पथकाच्या मदतीने ज्याठिकाणी मृत्यू झाला त्या जागेची पाहणी करण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे डीसीपी कुशल चौकसे यांच्या नेतृत्वाखाली किम्स रुग्णालयात जाऊन आकाशच्या कुटुंबियांकडून माहिती घेऊन मित्रांची चौकशी सुरु आहे. तसेच आकाशच्या दोन मित्रांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यासंदर्भात किम्स रुग्णालयात धारवाड पोलीस कमिश्नरांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे. यासंदर्भात बोलताना त्यांनी, प्राथमिक तपासात आकाशच्या डोक्यावर दुखापत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी आकाशच्या सहा मित्रांवर आरोप करण्यात आला असून संशयास्पदरित्या झालेल्या मृत्यूप्रकरणाचा तपस जलदगतीने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: