EVENT

लेफ्टनंटपदी नियुक्ती झालेल्या जवानाचे भव्य स्वागत

Share

हुक्केरी येथील शेट्टी घराण्यातील अथर्व शेट्टी या तरुणाची भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून अगदी लहान वयात नियुक्ती झाली. नियुक्ती झाल्यानंतर शहरात आल्यावर शहरातील नागरिकांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले.

देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय सैन्यात सेवा करायची आहे. मात्र ही संधी दुर्मिळ असते. मात्र हुक्केरी शहरातील अधिवक्ता अनिल शेट्टी यांचा मुलगा अथर्व शेट्टी याने लष्करात लेफ्टनंट पदावर रुजू होऊन या भागातील तरुण समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे हुक्केरी शहराचे नाव उंचावले गेले असून कमी वयात लेफ्टनंटपदी वर्णी लागलेल्या नावात अथर्व शेट्टी यांचे नाव आता जोडले गेले आहे. लेफ्टनंटपदी वर्णी लागल्यानंतर अथर्व शेट्टी यांचे हुक्केरीत आगमन होताच शहरातील अडविसिद्धेश्वर मठाच्या प्रांगणातून माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांनी त्यांचे भव्य मिरवणुकीद्वारे स्वागत केले.

यानंतर हिरेमठचे चंद्रशेखर महास्वामी, वीरक्त मठाचे शिवबसव महास्वामी व अभिनव मंजुनाथ महाराज यांच्या दिव्य उपस्थितीत निलांबिका शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली समारंभ झाला. माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांनी वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी लेफ्ट. अथर्व शेट्टी यांचा विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सत्कार स्वीकारल्यानंतर बोलताना अथर्व शेट्टी म्हणाले की, माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने आणि माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे माझी उत्तर कर्नाटकात लष्करी अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

यावेळी एसके पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. यावेळी सी.एस. तुबाची शैक्षणिक संस्था, सी.आर. शेट्टी फाऊंडेशन आणि हुक्केरी सिटिझन्स आणि एक्स-सर्व्हिसमन असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

Tags: