Belagavi

थ्रो बॉल दिव्यांग क्रीडापटूला आर्थिक मदतीची गरज

Share

सलग 9 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बेळगावमधून निवड झालेल्या दिव्यांग खेळाडूंना श्रीलंकेला जाण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सहकार्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आज आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हि माहिती देण्यात आली. आंतरराष्ट्रीय पॅरा थ्रो बॉल चॅम्पियनशिप 8 ते 10 जुलै दरम्यान श्रीलंकेत आयोजित करण्यात आहे. यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बेळगावमधील ५ पुरुष आणि २ महिला अशा एकूण ७ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. मात्र त्यांना श्रीलंकेला जाण्यासाठी आर्थिक समस्या भेडसावत आहे. जर क्रीडाप्रेमी आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन आम्हाला संधी दिली तर आमच्या प्रयत्नांना फळ मिळेल, असे क्रीडापटू महांतेश होंगल यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कीर्ती वाढवणाऱ्या या अपंग खेळाडूंपैकी एकही सरकारी कर्मचारी नाही. गेल्या 2016 पासून त्यांनी अथक प्रयत्न केले असून अखेर त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.. संपूर्ण देशातून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी बेळगावच्या खेळाडूची निवड झाली आहे, ही बेळगावच्या जनतेसाठी अभिमानाची बाब आहे. देणगीदारांनी मदत केल्यास भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकेल, असे मत समाजसेवक सुरेश यादव यांनी व्यक्त केले.

या पत्रकार परिषदेत सूरज धामणेकर, मन्सूर मुल्ला, इरण्णा होंडप्पनवर, सूरज कुंभार, मनीषा पाटील, भाग्यश्री एम. आदींचा समावेश होता.

Tags: