Banglore

बेंगळुरूत चोरांनी सकाळसकाळी सोनसाखळी लांबवली

Share

बेंगळुरूमध्ये आरआर नगर येथे मॉर्निंगवॉकसाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवून चोरट्यांनी पळ काढला असून यादरम्यान वृद्ध महिला रस्त्यावरच कोसळल्याची घटना घडली आहे.

बेंगळुरू येथील राजराजेश्वरी नगरमध्येमॉर्निंगवॉकसाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी पळविली आहे. राजराजेश्वरी नगर येथील कृष्णा गार्डनजवळील हॅप्पी होम्सजवळ ही घटना घडली असून सोनसाखळी ओढल्याने वृद्ध महिला रस्त्यावर पडली. हो चोरटे फरार झाले असून याप्रकरणी राजराजेश्वरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: