FUNERAL

ज्येष्ठ साहित्यिका डॉ. कमला हंपन्नांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले अंत्यदर्शन

Share

ज्येष्ठ कन्नड साहित्यिका डॉ. कमला हंपन्ना यांच्या अचानक निधनामुळे आपल्याला दुःख झाले असून साहित्य, कृषी यासह संशोधन आणि अध्यापनासाठी लोकप्रिय असलेल्या डॉ. कमला यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी व्यक्त केली.

बेंगळुरू येथील रवींद्र कलाक्षेत्र येथे ज्येष्ठ साहित्यिका कमला हंपन्ना यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहून कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. कमला हंपन्ना यांना गेल्या ४ – ५ महिन्यांपूर्वी आपण भेटलो होतो. महिला साहित्यिका म्हणून त्यांनी सर्वाधिक साहित्य प्रकाशित केले. साहित्य क्षेत्रासह कृषी, संशोधन आणि अध्यापनासाठी भरीव योगदान दिले. प्राकृत भाषेवर संशोधन केले. बेंगळुरू, म्हैसूर आणि विजयनगर येथे कन्नड शिक्षिका म्हणून सेवा बजाविली. त्यांच्या जाण्याने न भरून येणारे नुकसान झाले असून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो तसेच त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो, असे ते म्हणाले.

Tags: