hubbali

हुबळीतील चेन्नम्मा सर्कलजवळ 200 हून अधिक सायलेन्सर नष्ट

Share

हुबळीमध्ये मोठ्या आवाजामुळे लोकांना त्रास देणाऱ्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, शहरातील राणी चेन्नम्मा सर्कल येथे बुलडोझरद्वारे त्या जप्त केलेल्या दुचाकींचे 200 सायलेन्सर नष्ट करण्यात आले आहेत.
व्यापारी शहर हुबळीची शांतता बिघडवणारे मोठमोठे बाईक सायलेन्सर नष्ट करून पोलीस आयुक्तालयाने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठमोठे आवाज करून लोकांना त्रासदायक ठरणाऱ्या दोनशेहून अधिक दुचाकी वाहतूक पोलिसांनी जप्त करून पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली त्या गाड्यांचे सायलेन्सर रोड रोलर फिरवून नष्ट काण्यात आले .

हुबळी-धारवाडमध्ये कर्कश आवाज करत फिरण्याची सवय लावणाऱ्या जनतेला त्रास देण्याऱ्या विघ्नसंतोषींना वठणीवर आणण्याचे काम पोलिस विभागाने केले आहे.
.

Tags: