Kagawad

क्षीर भाग्य योजनेची महाराष्ट्रात विक्रीसाठी नेण्यात येणारी नंदिनी दूधपावडर जप्त

Share

राज्यातील सिद्धरामय्या सरकारने क्षीर भाग्य योजनेंतर्गत इयत्ता 1 ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना दूध देण्याचा निर्णय घेतला आहे,कागवाड पोलिसांनी या योजनेची सुमारे 10 लाख रुपये किमतीची नंदिनी दूध पावडर विक्रीसाठी आणणारी वाहने जप्त केली आहेत.

शुक्रवारी रात्री कागवाड-गणेश वाडी रस्त्यावरून महाराष्ट्र राज्य नोंदणी असलेल्या दोन टेम्पो वाहनांना कागवाड पोलिसांनी अडवून तपासणी केली असता, नंदिनी दुधाच्या पावडरची वाहतूक करत असल्याचे आढळून आले.

अटक केलेले तिघे आरोपी , बागलकोट जिल्ह्यातून नंदिनी दुधाची पावडर टेम्पोतून वाहतूक करून शेजारच्या महाराष्ट्रातील दूध डेअरीमध्ये पोहोचवत होते, जिथे ते दुधाचे इतर उपपदार्थ बनवण्यासाठी वापरत असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्य सरकार इयत्ता 1 ते 10 च्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दररोज 70 ग्रॅम पावडर दुधाचे उत्पादन करते, तर येथे 3750 किलो दुधाच्या पिशव्या सापडल्या आहेत .
हजारो विद्यार्थ्यांना दिले जाणारे दूध काळाबाजाराच्या माध्यमातून महाराष्ट्रात पोहोचवले जात होते .

बागलकोट जिल्ह्यातून नंदिनी दूध पावडर कोणत्या शाळेतून गोळा केली, याची चर्चा सुरू आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला गरमागरम माध्यान्ह भोजनासाठी पोषक दूध उपलब्ध करून देण्याचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा उद्देश आहे, मात्र या विद्यार्थ्यांसाठी असलेली दुधाची पावडरच विकण्याचा घाट घातल्याने अशा आरोपींना अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी जनतेची भावना आहे. .

Tags: