Belagavi

कै. राधाबाई रामकृष्ण जाधव यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Share

 

कै. राधाबाई रामकृष्ण जाधव यांच्या स्मरणार्थ बेळगाव येथील प्रसिद्ध विजया हॉस्पिटल आणि ट्रामा सेंटर यांच्या माध्यमातून होन्नीहाळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध डॉ. रवी पाटील व गावातील पंच मंडळीच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने करण्यात आले . या प्रसंगी बोलताना भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले कै. राधाबाई रामकृष्ण जाधव यांच्या स्मरणार्थ गावामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. निमित्त काही असले तरी जनतेला त्याचा लाभ व्हावा या दृष्टीकोनाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, याचा जनतेने लाभ घ्यावा असे ते म्हणाले,


या प्रसंगी बोलताना डॉ. रवी पाटील म्हणाले आपण गावातील लोक आपल्या आरोग्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही योग्य वेळी तपासणी करून घेत नाही आजार वाढल्या नंतर मोठ्या प्रमाणात आपण पैसे खर्च करतो पणं योग्य वेळी आपण तपासणी करून घेतली तर वेळीच रोगाचे निधन झाले तर कमी खर्च मध्ये आपण आपले शरीर चांगले ठेवू शकतो, आज गावामध्ये उत्कृष्ट वैद्य उपस्थित आहेत त्याचा लाभ जनतेने घ्यावा असे ते म्हणाले,
या कार्यक्रम प्रसंगी शहाजी जाधव, जोतिबा जाधव, चंद्रकांत केंगेरी, चनय्या मठद, इरय्या मठद, भरमा कटबुगोल, दानय्या गिरमनवर, चंद्रकांत जाधव, रायप्पा केंगेरी, बसवंत केंगेरी, महांतेश आजापन्नवर, सिद्दय्या मठपती आदी उपस्थित होते तसेच गावातील लोकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती

Tags: