JAATRA

रामदुर्ग तालुक्यातील गोडची गावात जेष्ठ पौर्णिमा साजरी

Share

 

रामदुर्ग तालुक्यातील गोडची गावात आजही जेष्ठ पौर्णिमेनिमित्त बेंदूर साजरा करण्यात आला .

उत्तर कर्नाटकातील वर्षातील पहिला सण म्हणजे जेष्ठ पौर्णिमा म्हणजेच बेंदूर सण साजरा केला जातो . या दिवशी बैलांना आंघोळ घातली जाते, त्यांना त्यांच्या शिंगांना रंगले जाते , तसेच शिंगाना मोरपिसे , रिबिनी बांधल्या जातात . बैलांना सजवले जाते, , बैलांना गोड नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर संध्याकाळी सजवलेल्या बैलांची गावात मिरवणूक काढली जाते. ,
गावातील कडुनिंबाच्या डहाळ्या बांधल्या जातात . बैलांच्या गळ्यांमध्येही कडुलिंबाच्या डहाळ्या बांधण्यात आल्या होता . या बैलांची पूर्वज केल्यानंतर त्यांना पळवण्यात आले . शेतकरी बैलांच्या मागे-मागे धावत, जल्लोष करत जयजयकार करीत होते .

बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील गोडची गावात आजही जेष्ठ पौर्णिमा साजरी केली जाते त्याचप्रमाणे शहरातील सर्व ग्रामस्थांनीही वेगवेगळी वस्त्रे परिधान करून ही पौर्णिमा साजरी केली आहे.

Tags: