खानापूर तालुक्यातील नंदगड येथील डीसीसी बँकेच्या मागील बाजूची संरक्षक भिंत गटारीवर कोसळल्याने गटार तुंबली असून या समस्येकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत.

गेल्या १५ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सदर संरक्षक भिंत त्या परिसरात असलेल्या गटारीवर कोसळली होती. मातीचा ढिगारा गटारीवर पडल्याने गटारातील पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे अनेकवेळा तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्षांच्या प्रभागातच हि समस्या उद्भवली आहे. परंतु याकडे ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्षा संगीता मड्डीमनी यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. नंदगड गावचा याआधी गांधी ग्राम पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. यामुळे हा सन्मान जपण्यासाठी अशा समस्यांकडे गांभीर्याने लक्ष पुरवून तातडीने समस्या सोडविण्याची गरज आहे, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.


Recent Comments