Accident

लॉरीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात :एक ठार तर दोघे जखमी

Share

 

खानापूर शहराच्या हद्दीत मरियम्मा मंदिराजवळ हलकर्णे येथे एका ट्रकला ओव्हरटेक करताना एका दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने एक जण ठार तर दोन जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली .

विद्यानगर खानापुर येथील संजू मल्लापा सत्यनायक (वय ३६) हे त्यांची दुचाकी केए २२ एचसी ३२२७ होंडा शाइन घेऊन , बेळगावकडे जात होता . मरिअम्मा मंदिर हलकर्णी क्रॉसजवळ (KA 22-8247) या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता, समोरून येणाऱ्या तुकाराम सुतार यांच्या (KA 22-HA 4806) या दुचाकीला धडक दिल्याने , दुचाकीस्वार तुकाराम व त्यांची पत्नी सारिका तुकाराम सुतार हे जखमी झाले आहेत . त्यांच्यावर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर , संजू मल्लाप्पा सत्यनाईक यांची दुचाकी लॉरीच्या उजव्या बाजूस आदळल्याने त्यांचा पाय लॉरीच्या मागच्या चाकात अडकून गंभीर जखमी झाले होते . त्यांना तात्काळ खानापुर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र संजू सत्यनायक हा गंभीर जखमी झाल्याने त्याला प्राथमिक उपचारानंतर बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचार निष्फळ ठरल्याने त्यांचा मृत्यू झाला. संजू सत्यनायक यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे,
अपघाताची नोंद खानापुर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Tags: