Hukkeri

रोगमुक्त वातावरणासाठी योग आवश्यक – विजय रवदी

Share

रोगमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी योग आवश्यक आहे, असे हुक्केरी एकात्मिक ग्रामीण विकास संस्थेच्या संस्थापक विजय रवदी यांनी सांगितले.
व्हॉइस ओव्हर : आंतरराष्ट्रीय योग दिनाचा एक भाग म्हणून आज हुक्केरी शहरात पतंजली योग समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.


श्री राम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांने रोपट्याला पाणी घालून शहराच्या बाह्य भागातील येथील रवदी फार्म हाऊसवर आयोजित कार्यक्रमाची सुरुवात केली . आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगातून स्वदेशी भावाची जाणीव करून दिली आणि भारतातील शास्त्रोत्र आणि वैज्ञानिक योगाची ओळख करून दिली. असे ते म्हणाले .

यावेळी व्यासपीठावर विजय रवदी , प्रमोद मुतालिक , , शशिकला रवदी उपस्थित होत्या.
नंतर योग शिक्षक बाळकृष्ण कोळेकर, के.बी.बडिगेर, बोंगाळे, संदीप सूर्यवंशी, राजू गस्ती यांचा सत्कार करण्यात आला.


विजय रवदी यांनी बोलताना सांगितले की, हुक्केरी शहरात दररोज मोफत योगसाधना केली जात असून नागरिकांनी याचा लाभ घेऊन हुक्केरी शहर रोगमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे.
यावेळी शेकडोच्या संख्येने महिला व पुरुषांनी योगाभ्यास केला.

Tags: