रामतीर्थ नगर रहवासी संघ आणि सुरेश यादव फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
बेळगाव येथील कणबर्गी तलावाशेजारील उद्यानात रामतीर्थ नगर रहवासी संघ आणि सुरेश यादव फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी या फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेश यादव बोलताना म्हणाले, पंतप्रधान मोदींनी 2014 च्या संयुक्त राष्ट्र महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव मांडला होता, तेव्हा तो 177 देशांनी एकमताने स्वीकारला होता.

कर्नाटक अल्पसंख्याक आयोगाचे तत्कालिन माजी अध्यक्ष मुक्तार पठान यांनी दररोज योगासने केली पाहिजेत, असे सांगितले.
यावेळी प्रतीक्षा महादेव टोने यांच्या उपस्थितीत योगासने सादर करण्यात आली. यावेळी संतोष मेरकर, राजशेखर शेंद्री, गटपुत्रप्पा तोरगल, अप्पय्या कोलकार, अभिषेक, निरंजन, सुरेश उरबनट्टी, महादेव टोने, सागर किनेकर, विलास केरुर, मल्हारा दीक्षित, अक्षय अंबडगट्टी आणि रामतीर्थ नगरातील शेकडो लोक सहभागी झाले होते.


Recent Comments