डिग्गेवाडी गावाच्या स्वच्छतेसाठी व प्रगतीसाठी जनतेने सहकार्य करावे. गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्वांनी हातमिळवणी करावी.असे ग्रामपंचायत अध्यक्ष रवी चौगले म्हणाले .

रायबाग तालुक्यातील डिग्गेवाडी गावात 15 व्या वित्त योजनेंतर्गत अडीच लाख खर्चाच्या गटारी बांधकाम कामाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, गावात स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, सुसज्ज रस्ता या सुविधा करून गावाला आदर्श गाव बनविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील.
यावेळी परशुराम कांबळे, आप्पासाहेब म्हैशाळे, महांतेश चौघुले, बाळू जमादार, रमेश ऐनपुरे, महादेव कांबळे, दिलीप जमादार , गंगाधर म्हैशाळे, कांबळे, प्रवीण चौघुले यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments