विजयपूर जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व जिल्हा आयुष विभाग यांच्यावतीने 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे, बी.आर. आंबेडकर स्टेडियमवर आयोजन करण्यात आले होते.
शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून जोरदार योगासने करून लक्ष वेधले. या संदर्भात बोलताना ते म्हणाले कि , भारत आज आशिया खंडाचा भाग राहिलेला नाही.तर योगातून विश्वगुरू पदाकडे वाटचाल करत आहे. सौदी अरेबियासह जगातील अनेक देशांमध्ये योगाभ्यास केला जातो. आता योगामध्ये भारत जगासमोर एक मॉडेल आहे, असे ते म्हणाले.

योगाने प्रत्येकजण निरोगी होतो. त्यामुळे प्रत्येकजण दिवसातून अर्धा तास योगासने करून केवळ बीपी आणि शुगर नियंत्रणात ठेवू शकत नाही तर अनेक आजारांपासून संरक्षण मिळवू शकतो, योगामुळे आयुष्य वाढते, असे ते म्हणाले.
शहरात अनेक उद्याने आहेत. वॉकिंग पार्क आणि जिम आहेत. त्यामुळे विजयपूरच्या जनतेने योगासने करून निरोगी आयुष्य जगावे, अशा यत्नाळ यांनी शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी टी. भुबलन, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी आनंद, जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनावणे , विविध विभागांचे अधिकारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आदींनी योगासनांमध्ये सहभाग घेतला.
शहरासह जिल्हाभरात विविध ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला.


Recent Comments