Athani

अनंतपूर सार्वजनिक रुग्णालय नाममात्र

Share

शासनाने जनहिताच्या 108 योजना राबवली , मात्र स्थानिक अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे सीमाभागातील जनता लाभापासून वंचित आहे .

महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील अनंतपूर सार्वजनिक रुग्णालय केवळ उघडे दिसण्यापुरतेच मर्यादित आहे. रुग्णालयात डॉक्टर नसल्याने अनेकवेळा वरिष्ठांकडे दाद मागूनही ते ऐकत नसल्याचा आरोप अनंतपूर ग्रामस्थांनी केला .

आमदार राजू कागे यांच्या गृह मतदारसंघात गोरगरीब जनतेला संरक्षण न देणारे रुग्णालय आम्हाला नको, असे म्हणत स्थानिकांनी लोकप्रतिनिधींविरोधात रान उठवले आहे. निवडणुकीपुरते मर्यादित न राहता जनतेच्या समस्या सोडविण्यास सुरुवात करावी, हीच स्थानिकांची अपेक्षा आहे.

Tags: