INCIDENT

वटपौर्णिमेदिवशीच खानापुरात उन्मळून पडला वटवृक्ष!

Share

खानापूर परिसरातील जांबोटी मार्गावरील हनुमान मंदिर नजीक असलेला शेकडो वर्षाचा विशाल वटवृक्ष कोसळला.

जांबोटी मार्गावरील हनुमान मंदिर नजीक शेकडो वर्ष जुना असलेला वटवृक्ष अचानक कोसळला. आज वटपौर्णिमा असल्याने शेकडो महिलांनी आज याठिकाणी पूजा केली. मात्र अचानक हा वटवृक्ष कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आज शेकडो महिला याठिकाणी पूजेसाठी हजर होत्या. मात्र सुदैवाने वटवृक्ष कोसळताना याठिकाणी कुणीही नसल्याचे मोठा अनर्थ टळल्याने समाधान देखील व्यक्त होत आहे.

Tags: