Kagawad

गुरुवारी सकाळी भाजप पक्षाच्या वतीने कागवाड-बेळगाव राज्य महामार्ग धरणार रोखून

Share

सरकारची पेट्रोल-डिझेलची दरवाढ, मुद्रांक शुल्कात वाढ, याविरोधात भाजप पक्षाच्या कागवाड युनिटच्या वतीने गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता कागवाड-बेळगाव राज्य महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे कागवाड मंडळाचे अध्यक्ष तमन्ना पारशेट्टी यांनी सांगितले.

बुधवारी भाजप पक्षाने कागवाडमध्ये पत्रकार परिषद घेऊन रास्ता रोको करून आंदोलन करण्याची माहिती दिली.
गुरुवारी , सकाळी 10:30 वाजता भाजपचे माजी मंत्री श्रीमंत पाटील, युवा नेते श्रीनिवास पाटील यांच्यासह भाजप पक्षाचे नेते आणि तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते रास्ता रोको कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यासाठी तमन्ना पारशेट्टी यांनी कागवाड तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना रास्ता रोको कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ( )

यावेळी ऐनापूर शेतकरी कामगार पक्षाचे उपाध्यक्ष अप्पासाहेब पाटील, संचालक राजेंद्र पोतदार, प्रवीण कुलकर्णी, उमेश करची, अन्वेष अपराज, सुरेश कुडूवक्कलगी, सदाशिव केरीपाळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: