Education

जातिव्यवस्थेमुळे समाजात विषमता : मुख्यमंत्री

Share

सुशिक्षितांमध्येच जातीभेदाचे प्रमाण अधिक वाढत असून उच्च शिक्षण घेणाऱ्यांनीही जातीपातीच्या बेड्या मोडल्या नाहीत. जे वाचन करतात, त्यांचा नियती आणि कर्म सिद्धांतावर विश्वास आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा मूर्खपणावर विश्वास ठेवू नये, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी समाज कल्याण विभागाच्या कर्नाटक निवासी शैक्षणिक संस्था संघटनेच्या संयुक्ताश्रयाने आयोजिलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी उपरोक्त विधान केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, राज्यातील दलित संघर्ष समितीची बैठक झाली त्यावेळी आम्हाला दारूची दुकाने नको तर शाळांची गरज असल्याचा मुद्दा मांडला. या संघर्षातून प्रेरणा घेत पहिला अर्थसंकल्प सादर करताना ग्रामीण भागात मोरारजी शाळा सुरू झाल्या. तेव्हापासून मोरारजी शाळा निरंतर कार्यरत आहेत. समाज कल्याण विभागांतर्गत सध्या ८३३ निवासी शाळा असून अल्पसंख्याक विभागाच्या अंतर्गत एकूण ९४६ निवासी शाळा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काही ठिकाणी एकापेक्षा जास्त निवासी शाळा आहेत. यावर्षी २० निवासी शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ग्रामीण भागात प्रत्येकाला दर्जेदार तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक शिक्षण मिळाले पाहिजे. जातीव्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

जातीव्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली आहे. हे दूर करणे आवश्यक आहे. शिक्षण मिळाल्यामुळेच मला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली नाहीतर, मी स्वतःला म्हशी आणि गायी चारण्यापुरते मर्यादित ठेवले असते असे ते म्हणाले. बुद्ध आणि बसवण्णा यांनी शतकानुशतके जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी कठोर परिश्रम केले. मात्र सुशिक्षित लोकांमध्ये जातिभान वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Tags: