Athani

इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे गॅरेजला आग

Share

दुचाकीच्या गॅरेजला इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून संपूर्ण गॅरेज जळून खाक झाले.

गावातील अथणी-खिलेगाव राज्य महामार्गालगत व्यापारी दुकानात असलेल्या सचिन कोडगा यांच्या मालकीच्या डीके गॅरेजला आग लागून मोठे नुकसान झाले. गॅरेजमधील तीन दुचाकी, टायर, तेल व इतर वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यात यश मिळविले. ही घटना अथणी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली आहे .

Tags: