Belagavi

शेजारील राज्यांच्या तुलनेत कर्नाटकातील इंधनदर कमी : सतीश जारकीहोळी

Share

भाजपने राज्याला कत्तलखान्यात रूपांतरित केले आहे. बेळगावचे माजी आमदार अनिल बेनके यांनी आपल्या कार्यकाळात कुठे विकासकामे केली? त्यांच्या कार्यकाळात ते कुठेच बाहेर पडले नाहीत अशी टीका जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली.

बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, शेजारील राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यात इंधनाचे दर कमी आहेत. भाजपच्या कार्यकाळात सिलिंडरचे दर वाढले त्यावेळी कुणाला जाब विचारण्यात आला नाही? असा टोला त्यांनी लगावला.

सांगलीतील कन्नड शाळांसाठी मराठी शिक्षकांच्या नियुक्तीबाबत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, सांगलीत एकही कन्नड शिक्षक जात नाही. कन्नड शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच बंदी घातली आहे. त्यामुळे तेथील मुलांना मराठी शिकणे अनिवार्य असल्याचे जारकीहोळी म्हणाले.

बेळगावच्या खासबागमधील बाजारपेठेत गाळ्यांचे वितरण अद्याप झाले नाही. आता त्याठिकाणीही कसायांची दुकाने झाली, याबाबत चर्चा करण्यासाठी मोठे अधिवेशन भरवू अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडविली.

श्री क्षेत्र सौंदत्ती यल्लम्मा देवस्थान विकासासाठी १२० कोटी रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात येत असल्याचे जारकीहोळी म्हणाले.

बेळगावमधील नवीन ओव्हर ब्रिजसाठी ब्ल्यू प्रिंट पाठविण्यात आली असून लवकरच याचे कामकाज देखील सुरु होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

केपीसीसी कार्याध्यक्ष विनय कुलकर्णी यांना मंत्रीपद मिळू शकते. आमच्या सरकारला अजून चार वर्षे आहेत. अनेकांना संधी मिळू शकते, असे ते म्हणाले.

एल अँड टी कंपनीसोबत बैठक घेऊन सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र अद्याप कामकाज पूर्ण झाले नसून जर एल अँड टी कंपनीने रस्ता खोदला तर त्यांना रस्त्याचे काम स्वतःच दुरुस्त करावे लागेल. आणखी काही दिवस यावर लक्ष ठेवून नव्याने निविदा काढण्याची तयारी सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार राजू सेठ, आमदार विश्वास वैद्य तसेच काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: