hubbali

नगरसेवक निरंजन हीरेमठ यांच्या पीएचे अपहरण करण्याचा प्रयत्न ?

Share

नगरसेवक निरंजन हीरेमठ यांच्या पीए विजय (एरण्णा) यांचे आज पहाटे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.

पहाटे पाचच्या सुमारास विजय , गजानन बँकेसमोरील वाळवेकर गल्लीत गेला असता तीन जण कारमध्ये आले आणि त्यांनी व्हिडीओ काढण्यासाठी त्याच्या खिशातील मोबाईल काढून घेतला . कारमधून आलेल्यांनी विजयला पकडण्याचा प्रयत्न केला असता विजय त्यांच्या तावडीतून सुटून पळून गेला.

त्यानंतर त्यांनी 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून विजयला सुखरूप ताब्यात घेऊन घटनास्थळी जाऊन तपास केला. अपहरणाच्या प्रयत्नाची घटना तिथे असलेल्या बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे का, याचा शोध घेत आहेत.

अपहरण करायला कोण आले? त्याने अपहरणाचा प्रयत्न का केला? या सगळ्याचे उत्तर पोलिसांच्या तपासानंतरच कळणार आहे.

याप्रकरणी घंटिकेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: