Belagavi

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन साजरा

Share

 

बेळगाव जिल्हा शिवसेना सीमावासीय आणि आर्यन फौंडेशनच्या वतीने , खडेबाजार येथील बेळगाव जिल्हा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना जिल्हा प्रमुख व आर्यन फाउंडेशचे संस्थापक हणमंत मजूकर यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला .

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख हणमंत मजूकर आणि , परशराम गोंदकर यांच्या हस्ते , छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
यावेळी हणमंत मजूकर म्हणाले कि , मराठी लोकांच्या मागे शिवसेना खंबीर उभी आहे . मराठी माणसाचा आणि हिंदुत्वाचा आवाज कायम बुलंद ठेवण्यासाठी शिवसेना कायम कार्यरत आहे . .शिवसेना सीमाबांधवांच्या मागे कायम उभी आहे .
कार्यक्रमाला अमोल मजूकर , रमेश पाटील , आहोम देसाई , मीनाक्षी पाटील , भारती राक्षे , संजू नाकाडी , शंकर गुरखा आदी उपस्थित होते .

Tags: